
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य,फलटण,दि १: मालोजीनगर, कोळकी येथील सुहास विनायक लिपारे यांचे आजाराने नुकतेच निधन झाले. सुहास लिपारे हे 52 वर्षांचे होते. सुहास लिपारे हे बाजार समिती फलटण येथे सेवेत होते. अत्यंत मन मिळावू व्यक्तीमत्त्वामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता.
त्यांच्या मोठ्या मुलाची अक्षय लिपारे याची नुकतीच आसाम रायफल मध्ये निवड झालेली आहे. परिवार साडी सेंटर, फलटणचे मालक गणपत लिपारे यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
