ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, पुण्यातील बैठकीत निर्णय; एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांचा संप मागे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पुणे, दि.२९: महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली. बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच, या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस आदी नेते उपस्थित होते.

ऊस तोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी मान्य झाल्यामुळे तसेच, अन्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे ऊस तोडणी कामगार संघटनांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर करून कामगारांना कारखाना स्थळावर ऊसतोडणीसाठी जाण्याचे आवाहान केले.

ऊसतोड कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत फडणवीस सरकारने 2014 मध्ये घोषणा केली होती ,परंतु पाच वर्षांमध्ये हे मंडळ कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची मागणी प्रलंबित होती. याबाबत समाधानकारक निर्णय बैठकीत झाला आहे.

राजाय्चे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, पंकजा मुंडे यांनी मी कुठलाच आकडा जाहीर केला नव्हता. यंदा जी काही वाढ मिळालीय त्यावर आम्ही समाधानी आहोत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. नोव्हेंबरमध्ये नोंदणी सुरू होईल त्यातून त्यांचे अनेक प्रश्न मिटणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!