दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
पिंपळवाडी, साखरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत जमीन गट नं. ३८ चा १ मध्ये थद. २३ ऑटोबर २०२३ रोजी रात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत सुमारे ७३,५०० रूपयांचे १५ ते १६ महिन्यांचे तोडणीला आलेले ऊस पीक जळून खाक झाले आहे. या घटनेची फिर्याद दत्तात्रय बबन पवार (रा. पिंपळवाडी, साखरवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. फौजदार एम. आर. हांगे करत आहेत.