पुनवडी येथे एकाची आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । सातारा । पुनवडी ता. सातारा येथील बसथांब्याच्या शेडमध्ये एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुनवडी येथील चंद्रकांत बंडू मनवे वय ४० यांनी बसथांब्याच्या शेडमधील लोखंडी पाईपला नॉयलाईनची दोरी बांधून गळफास घेतला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत बाबूराव मनवे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.

Back to top button
Don`t copy text!