मोरया हॉस्पिटल, फलटण मध्ये म्युकर मायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया


स्थैर्य, फलटण, दि. २३: कोरोना नंतर व कोरोना झाल्याच्या कालावधीत म्युकर मायकोसिस आजार होण्याचे प्रमाण खूप वाढू लागले असून त्यावरील यशस्वी उपचार पद्धती मध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व त्यासोबत ॲम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे डॉ. जनार्दन पिसाळ यांनी सांगितले आहे.

म्युकर मायकोसिस रुग्णांसाठी आवश्यक असणारी शस्त्रक्रिया फलटण मध्ये प्रथमच मोरया हॉस्पिटल मध्ये सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या केली आहे.

सदर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भूलतज्ञ डॉ. पवन भुजबळ, फिजिशियन डॉ. सौरभ खराडे, डॉ. अमोल घाडगे व डॉ. योगेश गांधी या तज्ञांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. जनार्दन पिसाळ यांनी सांगितले

फलटणमध्ये म्युकर मायकोसीस रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी भूलतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ व डेंटल सर्जन यांचे एक पथक तयार केले असून यापुढे या पथकाच्या साहाय्याने म्युकर मायकोसीस रुग्णावर फलटण येथेच यशस्वी उपचार केले जाणार असल्याचे डॉ. जनार्दन पिसाळ यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!