राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ‘राजयोग फिटनेस स्टुडिओ फलटण’चे यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२४ | फलटण |
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये राजयोग फिटनेस स्टुडिओचे योगसाधक जीनेशा गांधी, स्वानंदी रणवरे, बालाजी बिरादार, गणेश बिरादार, प्रांजली ननवरे, परी कदम, आर्या वादे, प्रणाली आढाव, संस्कृती कदम, महादेव बिरादार, वृषाली गांधी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये राजयोग फिटनेस स्टुडिओचे ऑनलाईन साधक महादेव बिरादार यांना ‘सिल्वर मेडल’ प्राप्त झाले. तसेच ‘जिनेशा’चे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेलचे अध्यक्ष यांनी तिला ‘ब्राँझ मेडल’ प्रदान करत तिचे कौतुक केले. त्याचबरोबर फलटण टीमला ‘बेस्ट टीम’ म्हणून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली.

यावेळी फलटण टीम कोचचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल फलटणचे टीमचे मार्गदर्शक कराडचे गजानन कुसूरकर सर यांचे फलटण टीमने आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!