दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण |
शिर्डी येथे दि. ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्र अमॅच्युअर किक बॉक्सिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींचा सहभाग होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश मिळवून सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावरती आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कु. अंजली रोमण, जान्हवी मर्दाने, अनिषा शिंदे, रितू कहार, धनश्री तेली या विद्यार्थिनींनी सुवर्णपदक पटकविले तर कु. गीतांजली बंडगर रौप्यपदक व कु. कादंबरी मोरे या विद्यार्थिनींनी कांस्यपदक प्राप्त केले. वरील सर्व खेळाडूंना प्रशालेतील कलाशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक सतिश नाळे यांनी मार्गदर्शन केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक प्राप्त केलेल्या विजेत्या खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अधीक्षक श्री. श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगवणे बी.एम., उपप्राचार्य श्री. ननवरे ए. वाय., जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. फडतरे एम. के., पर्यवेक्षक श्री. काळे शिवाजीराव व क्रीडा शिक्षक, शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.