कोयता गँगमधील फरार झालेले दोनजण जेरबंदशहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे यश


स्थैर्य, सातारा, दि.२४: दरोड्यातील गुन्ह्यासह ओमनी गाडीच्या काचा फोडून त्यातील पैसे घेऊन फरार झालेल्या कोयता गँगमधील दोघांना जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 जुन 2020 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास सदर बझार, सातारा येथील शिवांजली सोसायटी येथे कोयता गँगमधील युवकांनी उमेश आप्पाराव गायकवाड यांच्या डोक्यामध्ये कोयता व गुप्तीने वार करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम व इतर साहित्य जबरदस्तीने चोरून नेऊन दरोडा टाकला होता. याच टोळीने त्याच दिवशी विसावा नाका येथे ओमनी कार अडवून कारच्या काचा फोडून ड्रायव्हरच्या खिशातील पैसे चोरून नेले होते. तद्नंतर सातारा शहरात भरदिवसा कोयते नाचवून दहशत माजवली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे दोन वेगवेगळे दरोड्याचे गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना यापूर्वीच अटक केली होती. इतर युवक फरार होते. हा गुन्हा घडल्यापासून कोयता गँगमधील फरार असणारा जगदीश रामेश्वर मते हा दि. 22 रोजी शाहूपुरी सातारा येथे आपल्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाल्याने सापळा लावून त्याला अटक केली. त्याकडे त्याच्या साथीदारांबाबत कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून दि.24 रोजी सातारा शहर परिसरातून सौरभ संजय जाधव उर्फ गोट्या याला अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशात ‘लव जिहाद’ विरोधात कायदा; आरोपीस 10 वर्षांची शिक्षा

या कारवाईत सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ, संतोष कचरे, अभय साबळे यांनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!