ध्येय निश्चिती व जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते

पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे प्रतिपादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 7 मे 2025। फलटण । तरुणांनी ध्येय निश्चिती, सकारात्मक विचारसरणी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, ध्येय मोठं ठेवा, विचार सकारात्मक ठेवा तसेच सातत्याने प्रयत्न करत राहा, असे प्रतिपादन रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.

सोनगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकतर्फे आयोजित त्रिदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी या अभ्यासिकेचे कौतुक केले. छोट्याशा गावात विद्यार्थ्यांच्या आयुष्याला संजीवनी देणारी ही अभ्यासिकाआहे. या अभ्यासिकेला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन संदीप पिंगळे होते. प्रा. राजेश निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. पोपटराव बुरुंगले यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद लोंढे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास पोलिस पाटील दीपक लोंढे, हनुमंत थोरात, दत्तात्रय ननावरे, भगवान जगदाळे, नितीन शेंडगे, रामहरी पिंगळे, कांतीलाल चव्हाण, गणेश कांबळे, रमेश मदने, हनुमंत ननावरे, गणेश नामदास, अविनाश गोरे, नामदेव शिंदे, लखन पिंगळे, संतोष आडके, रमेश वाघ, सुधीर ओव्हाळ, प्रतीक लोंढे, सागर पाटोळे, विशाल निकाळजे, सुनिल रिटे, अनिल रिटे, दयानंद पिंगळे यांसह पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!