विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे – शिवाजी सावंत


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आत्मविश्वास आपणाला यशाचा मार्ग दाखवतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन बरड दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सावंत यांनी केले.

फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयातील एस.एस.सी. मार्च २०२४ ला प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर खरात उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी हनुमान माध्यमिक विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग गावडे ( सवई) होते. यावेळी सावंत बोलत होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एच. डी. अभंग सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेखर खरात, पै. बजरंग गावडे, मारुती बापू गावडे, बजरंग गावडे (सवई), मनोजतात्या गावडे, राधेश्याम जाधव यांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन पालक, विद्यालय आणि गावचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी चैतन्य कुमठेकर, कु. स्वप्नाली मदने, निकिता माने, मान्यता जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे (सवई), शेखर खरात, श्रीराम बझारचे संचालक मारूती बापू गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोजतात्या गावडे (सवई), संतोषदादा गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव, पोलिस पाटील विकास शिंदे, मोहन ननवरे सर, सुनील सस्ते सर, विकास घोरपडे सर, किरण पवार सर उपस्थित होते. मोहन ननवरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किरण पवार यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!