होलार समाजाची फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर

गणेश गोरे तालुकाध्यक्षपदी तर ओमकार अहिवळे यांची तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
शासकीय विश्रामगृह कोळकी येथे होलार समाजाच्या झालेल्या बैठकीत फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी राहुल करे (बाबा) यांच्या मार्गदर्शनाने युवक नेतृत्व संदीपभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली ढवळ गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पै. गणेश गोरे यांची तालुका अध्यक्षपदी आणि ओमकार अहिवळे मंगळवार पेठ, फलटण यांची तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रास्ताविक अमोल गोरे यांनी केले. यावेळी त्यांनी समाजाने तळमळीने व नि:स्वार्थी भावनेने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

महेंद्र गोरे यांनी लोकसभेपाठोपाठ येणारी विधानसभा निवडणूक फलटण तालुक्यातील होलार समाज पूर्ण ताकदीने कोणत्याही परिस्थितीत लढवणार आणि होलार समाजातील पहिला आमदार फलटण तालुक्यातून विधानसभेत पाठवणार, असे जाहीर केले.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश गोरे व उपाध्यक्ष ओमकार अहिवळे यांनी समाजापुढे अनंत अडचणी आहेत. त्या सोडवण्याचा तसेच शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी फलटण तालुक्यातील होलार समाजातील तरुण वर्ग व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!