एस.टी.च्या चाकाखाली चिरडून विद्यार्थिनी ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | वाई |
वाई येथील बसस्थानकावर एस.टी. बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थिनी आज दुपारी दीडच्या सुमारास चिरडल्याने जागीच ठार झाली. श्रावणी विकास आयवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

ही विद्यार्थिनी वाईच्या जोशी विद्यालयात सातवीत शिकत होती. वाई-बालेघर गाडी (क्र. एमएच १४ बीटी ०४९६) ही बस स्थानकावर फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी श्रावणी आयवळे ही विद्यार्थिनी गाडीच्या मागच्या चाकाखाली पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले.

या घटनेची माहिती मिळताच परीविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णाकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक जीवन मारूती भोसले (रा. नांदवळ) यास ताब्यात घेतले आहे.


Back to top button
Don`t copy text!