मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २७ : मलठण हा भाग सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेला भाग आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मलठण मध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसा ढवळ्या घरातील घरातील सोने, रोख रक्कम, पाण्याच्या मोटारी, सायकल, मोटार सायकल व किरकोळ भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. या सोबतच रस्त्यात अडवून चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून रोख रक्कम व मोबाईल काढून घेण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. तरी या मध्ये फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मध्ये जातीने लक्ष घालून गुन्हेगारांवर कडक कारवाई करून मलठणकरांना होणाऱ्या नाहक त्रासातून मुक्त करावे अशी मागणी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेवक अशोकराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

मलठण होणाऱ्या गुन्हे कमी कारण्याबात व भुरट्या चोरांवर कडक कारवाई करणे बाबतची मागणी फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, नगरसेवक अशोकराव जाधव, केशवराव भगत यांच्या नेतृत्वाखाली मलठण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे.

पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी निवेदनातील तक्रारी बाबत, प्रामुख्याने ज्यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत त्याबाबत योग्य तपास करुन, गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड करण्याचे आश्वासन दिले असल्याचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!