जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; केवळ १२३ रुपयांचा परवडणारा प्रीपेड प्लॅन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी केवळ १२३ रुपयांचा परवडणारा प्रीपेड प्लॅन आणला असून, यामध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि विविध फायदे मिळतात.

स्थैर्य, सातारा, दि. ३१ ऑक्टोबर : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने भारतीय बाजारपेठेत आपला सर्वात स्वस्त आणि परवडणारा १२३ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन विशेषतः जिओ फोन आणि जिओभारत युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

स्वस्त रिचार्ज आणि दमदार फीचर्स

कमी खर्चात महिनाभराचे रिचार्ज शोधणाऱ्या युजर्ससाठी जिओचा हा प्लॅन वरदान ठरत आहे. यामध्ये ग्राहकांना संपूर्ण २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या योजनेअंतर्गत कोणत्याही नेटवर्कवर महिनाभर मोफत आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दररोज ५०० एमबी हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे संपूर्ण कालावधीत एकूण १४ जीबी डेटा वापरता येतो. याशिवाय ग्राहकांना संपर्कात राहण्यासाठी एकूण ३०० मोफत एसएमएसची सुविधाही दिली जाते.

मनोरंजनासह इतर फायदे

केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही, तर या प्लॅनमध्ये मनोरंजनाचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या रिचार्जसोबत ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सावन आणि जिओ सिनेमा यांसारख्या ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लॅन केवळ ‘जिओ फोन’ आणि ‘जिओभारत’ (४जी फीचर्स फोन) वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच वैध असून, स्मार्टफोन युजर्सना याचा लाभ घेता येणार नाही. यामुळे इतर कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!