स्थैर्य, फलटण, दि.१३: महावितरणने सामान्य नागकिरांच्या पाठीशी लावलेला वीजबील वसूलीचा तगादा थांबवावा अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य वीज ग्राहकांच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
या निवेदनामध्ये गेल्या 10 महिन्यांची विजेची थकबाकी माफ करावी व ज्या ग्राहकाचे वीज कनेशन तोडलेले आहे ते त्वरीत चालू करावे. जानेवारी 2021 चे बील व थकीत बील यांचे समान 10 महीन्याचे टप्पे करून मिळावेत. असे न करता जर कोणाचे वीज कनेक्शन कट केले तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आमीर शेख, भाजप शहर अध्यक्ष अमोल सस्ते, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, मेहबुबभाई मेटकरी , राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे अल्प संख्या सेल चे फलटण तालुका अध्यक्ष ताजुद्दीन बागवान , आरपीआय चे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, सनी कदम, वसीम मणेर, राजु काळे, तानाजी कदम, रणजित भुजबळ, तुषार राऊत, मोहन पोतेकर, शंकर मुळीक, विशाल पोतेकर, रामभाऊ शेंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.