पालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा निश्‍चित करुन द्यावी; शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी


स्थैर्य, फलटण, दि.१३: फलटण शहरामध्ये वृत्तपत्र विक्रीला बसण्यासाठी फलटण नगरपालिकेने प्रमुख चौकांमध्ये विशिष्ट जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी फलटण शहरातील विविध वृत्तपत्र विक्रेत्यांमधून होत आहे.

सध्या फलटण शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्टॉल किंवा ते बसण्याची जागा त्यांना उपलब्ध होणार नाही असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तथापी, वृत्तपत्र म्हणजे एखादी वस्तू नसून लोकांपर्यंत चांगले विचार आणि ताजे वृत्त पोहचवण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई न करता त्यांना शहरातील प्रमुख चौकात ठराविक वेळेसाठी वृत्तपत्र विक्रीसाठी जागा निश्‍चित करुन द्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!