अज्ञातांकडून वडूज-डिस्कळ एसटी बस वर दगडफेक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । पुसेगाव । मंगळवारी पावणे सहाच्या सुमारास वडूज डेपोतून सोडण्यात आलेल्या वडूज-डिस्कळ एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान आज वडूज आगारातून सोडण्यात आलेली वडूज-डिस्कळ ही बस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना दोन अज्ञातांनी दुचाकीवर या गाडीचा पाठलाग करत पुसेगाव हद्दीत या बसवर दगडफेक केली. सुदैवाने यावेळी गाडीत एकही प्रवासी नव्हता, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून ड्रायव्हर व महिला कंडक्टर सुखरूप आहेत. सदर घटनेबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!