स्थैर्य, नशिक, दि.३१: संचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथील वर्ग चार कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत संचालक अश्र्विती दोर्जे यांना निवेदन देण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी मनोहर आबाजी गायकवाड यांनी दिली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांच्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये वर्ग-४कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली अनेक प्रश्नांवर चर्चा झाली . संचालक अश्विनी दोर्जे यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले या बैठकीत उपस्थित महासचिव सय्यद अजीम व नाशिक जिल्हा अध्यक्ष सीताबाई मोहिते महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिक येथील उपसंचालक प्रशासन श्री देशपांडे ,व सहाय्यक संचालक श्री बापू साहेब महाजन, सहाय्यक संचालक सुरक्षा श्री अनिल लोखंडे ,व तेथील कर्मचारी श्री सावळे , राज्य कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे, राज्य सल्लागार श्री वामनराव पाटील नाशिक जिल्हाअध्यक्ष श्री प्रविण साळी ,धुळे जिल्हाउपाध्यक्ष श्री विजय बाविस्कर, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री रामदास , दिल्लोड श्री अशोक शिरसाठ, श्री प्रकाश मोहिते नाशिक उपाध्यक्ष श्री चेतन घुंदे, श्री संदीप दोंदे ,श्री युवराज महाजन ,देवकी वैद्य ,रनी लव्हेरी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.