‘किसन वीर’ कडून इथेनॉल पुरवठ्यास प्रारंभ, विधिवत पुजनाने टँकर रवाना


स्थैर्य, भुईंज, दि.५: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात तयार करण्यात  आलेल्या इथेनॉलचा पेट्रोलियम कंपन्यांना सोमवारपासून पुरवठा सुरु करण्यात आला.  त्याचा प्रारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक मधुकर शिंदे, इन्चार्ज डिस्टीलरी मॅनेजर यु.के. जाधव व हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते टँकरचे विधिवत पुजन करण्यात आले.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून साखरेसह पुरक उद्योगांची जोड देऊन सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने इथेनॉल बाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होत आहे. कारखान्यास या हंगामाकरिता इथेनॉल पुरवठा करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना प्रकल्पातून निर्माण झालेल्या इथेनॉलचा पुरवठा करण्यात येणार आहे. कारखान्यावर सध्या प्रतिदिन ऐंशी हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प असून तो पूर्ण क्षमतेने सुरु आहे.


Back to top button
Don`t copy text!