
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेतन, थकीत भत्ते आणि सणासुदीच्या देण्यांसारख्या प्रलंबित आर्थिक मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या वतीने ३ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ३ नोव्हेंबर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवरून शासन आणि प्रशासनासोबतचा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर आर्थिक प्रश्न सुटले नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाली आहे.
विविध टप्प्यांत आंदोलन छेडण्याचा इशारा
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार, ३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील आगारांमध्ये घंटानाद, निदर्शने आणि धरणे आंदोलनासारख्या वेगवेगळ्या टप्प्यांमधील आंदोलने केली जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, सण अग्रिम आणि वेळेवर वेतन मिळावे, अशी प्रमुख मागणी असून याबाबत शासनस्तरावर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



