ग्रामीण भागातील प्रमुख गावात एस.टी. चालू करा : सचिन सूर्यवंशी (बेडके)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : आंतरराज्य व आंतरजिल्हा एसटी बस सेवेस शासनाने दिलेली परवानगी ही अभिनंदनास पात्र आहे. परंतू प्रमुख रस्त्यांवरील शहरी भागा व्यतिरिक्त ग्रामीण भागातील सर्वच तालुका अंतर्गत प्रमुख मार्गांवर दिवसातून किमान एक तरी फेरी सुरु करावी अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी केली आहे.

सध्या महाराष्टातील सर्व ग्रामीण व डोंगरी भागातील जेष्ठ नागरीक, प्रवासी, शालेय मुली, मुले, महिला यांना गणेश उत्सवानिमित्त प्रवास करणे कठीण होणार आहे. कोरोनामुळे एसटी बसची सेवा बंद होती. पण सध्या प्रवाशांची प्रवासाची अडचण सोडविण्यासाठी केवळ शहरी भागातीलच प्रमुख रस्त्यावर एसटी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे, परंतू तसे करुन चालणार नाही. ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वच तालुका अंतर्गत सस्त्यांवर आज पासूनच किमाण एक तरी एसटी बसची फेरी सुरू करणे गरजेचे आहे. नविन शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय मुलांना प्रवेशासाठी तसेच मुलांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, उत्पनाचे, जातीचे, नॉन किमीलेअर , रहिवाशी आदी दाखले कागदपत्रे गोळा करण्यासाठी तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी यावे जावे लागत आहे. त्यांना खाजगी वाहतूक सेवाही पूर्णपणे बंद असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच गौरी गणपती सणात सुध्दा महिलांना खरेदीसाठी ये-जा करण्यासाठी एस टी सेवा बंद असल्याने अडचण निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवरुन एसटी सुरु व्हावी अशी मागणी सातत्याने ग्रामीण भागातील प्रवाशांकडून होत आहे. ग्रामीण जनतेच्या मागणीचा गांभिर्याने विचार करून आजपासूनच तालूका अंतर्गत एसटी बसच्या फेर्या सुरू करणेसंबधीचे नियोजन बस डेपो मार्फत करावे व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी  निवेदनात सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी केली आहे.

गुरुवार दि. २० ऑगस्ट पासून आपल्या एसटी डेपो मार्फत महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार प्रमुख मार्गावर एसटी बसेस सरू केल्याबद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांचे तसेच महाआघाडी सरकारचे मंत्री महोदयांचे व सर्व शासकीय अधिकारी यांचे प्रवासी, जनता व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!