एसटी बँक सेवा त्वरित सुरू करण्याची एसटी कर्मचार्‍यांची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | बारामती |
एसटी को-ऑपरेटीव्ह बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी कर्मचार्‍यांचे पगार होण्यास अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे बँकेच्या कामकाजासाठी मोठ्या संख्येने अडचण होत असल्यामुळे लवकरात लवकर एसटी बँकेचा संप मिटवावा व सेवा पूर्ववत करा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी एसटी कर्मचारी करत असून त्याबाबत आंदोलन करून बारामती एमआयडीसी आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राजेंद्र काटे, शाहिद सय्यद, प्रकाश काळभोर, राजेंद्र गवंडी, दादा साळवी, राजेंद्र भोसले, राजेंद्र भोसले, मनोहर जगताप, सोमनाथ गायकवाड, मनोज ठाकूर, संजय जगताप व इतर कर्मचारी उपस्थित होते.

बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा व कर्मचार्‍यांच्या आडमुठी धोरणाचा सर्वसामान्य एसटी कर्मचार्‍यांना त्रास होऊन त्यांची गैरसोय होत आहे. दर महिन्याला एसटी बँकेत पगार होत असतो. संप असल्याने अद्याप पगार मिळाला नाही, कर्ज प्रकरण होत नाही, हप्ते भरणे आदी कामांसाठी गैरसोय होत असल्याने एसटी बँकेचा संप मिटवावा किंवा पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी करत व प्रशासनविरोधी घोषणा देत बारामती एमआयडीसी आगार येथे आंदोलन करत आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

कामगार संघटना, सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटना, कामगार सेना आदी कामगार संघटना व पदाधिकारी यांच्या वतीने प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!