फलटण आगारातून एस.टी.बसेस सुरु


स्थैर्य, फलटण, दि.१०: लॉकडाऊनमुळे बंद असलेली एस.टी. बस सेवा अंशत: प्रमाणात सुरु करण्याचा निर्णय फलटण आगाराच्यावतीने घेण्यात आला असून मुंबई, पुणे, सातारा, बारामती, इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी मर्यादित स्वरुपात एस.टी. बसच्या फेर्‍या आगाराने सुरु केल्या आहेत.

फलटण – बोरीवली सकाळी 8:30 वाजता, फलटण – मुंबई सकाळी 11:30 वाजता, फलटण – स्वारगेट सकाळी 7:00, 10:00 व दुपारी 1:00 वाजता, फलटण – बारामती सकाळी 7:00 वाजता, फलटण – इचलकरंजी सकाळी 6:30 वाजता, फलटण – कोल्हापूर सकाळी 6:30 वाजता या वेळापत्रकानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवा सुरु करण्यात आली असून प्रवाशांनी शासनाच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करुन या प्रवास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!