स्थैर्य, फलटण, दि.१०: लॉकडाऊनमुळे बंद असलेली एस.टी. बस सेवा अंशत: प्रमाणात सुरु करण्याचा निर्णय फलटण आगाराच्यावतीने घेण्यात आला असून मुंबई, पुणे, सातारा, बारामती, इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी मर्यादित स्वरुपात एस.टी. बसच्या फेर्या आगाराने सुरु केल्या आहेत.
फलटण – बोरीवली सकाळी 8:30 वाजता, फलटण – मुंबई सकाळी 11:30 वाजता, फलटण – स्वारगेट सकाळी 7:00, 10:00 व दुपारी 1:00 वाजता, फलटण – बारामती सकाळी 7:00 वाजता, फलटण – इचलकरंजी सकाळी 6:30 वाजता, फलटण – कोल्हापूर सकाळी 6:30 वाजता या वेळापत्रकानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवा सुरु करण्यात आली असून प्रवाशांनी शासनाच्या निर्बंधांचे काटेकोर पालन करुन या प्रवास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.