दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय, दालवडीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
दालवडीसारख्या ग्रामीण भागात सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल ९५.६५% लागला असून प्रथम क्रमांक चव्हाण श्रेेयश नामदेव याने ९२ टक्के गुण मिळवले. द्वितीय क्रमांक गोरे कुलदीप शिवाजी याचा आला असून त्याने ९१.८०% गुण मिळवले तर मोहिते सुमित अनिल याने ८७.२०% गुण मिळवले.
परीक्षेत एकूण ४६ विद्यार्थी बसले होते. पैकी ४४ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेडगे सर तसेच वर्गशिक्षक श्री. निंबाळकर सर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्कूल कमिटी चेअरमन नितीनशेठ गांधी, प्रशासनाधिकारी निकम सर यांनी यशस्वी विद्यार्थी, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर स्टाफचे अभिनंदन केले.
दालवडीसारख्या ग्रामीण भागात सेमी इंग्रजीच्या माध्यमातून ९० % पेक्षा जास्त गुण मिळवून विद्यार्थी यशस्वी झाले. याबद्दल दालवडी व पंचक्रोशीमध्ये विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.