फलटण नगर परिषदेने सहा अनधिकृत होर्डिंग्ज काढले


दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेने खाजगी इमारतीवरील व सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या होर्डिंग्जधारकांना दि. १७ मे २०२४ चे पत्राने अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत सूचित केले होते.

सद्य:स्थितीत वादळी वार्‍यामुळे मोठ्या आकाराचे होर्डींग बोर्ड तुटून रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आल्यामुळे बुधवार, दि. २९ मे २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एक, सावता माळी मंदिर येथील तीन व बारामती पुलाजवळील दोन असे एकूण सहा होर्डिंग्ज काढण्यात आली, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!