दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट व सेवा समर्पण ग्रुप करत असलेले कार्य कौतुकास्पद असून भावी पिढीला घडवण्याचे काम करत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केले.
फलटण येथे श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट व सेवा समर्पण ग्रुप आयोजित नवरात्र उत्सव व्याख्यानमालेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शहा बोलत होते. यावेळी आचार्य श्री. शामसुंदर शास्त्री यांनी समाजामध्ये स्त्रीला प्रथमतः सन्मानाचे व प्रमुख स्थान देण्याचे काम हे चक्रधर स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी केल्या असून महानुभाव संप्रदायामध्ये स्त्रीला पूजेचा व मोक्षाचा अधिकार प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे चक्रधर स्वामींनी केले केले असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. मुरालीमल बाबा संत, श्री. नरेंद्र शास्त्री लांडगे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक परमपूज्य गोविंदराज लांडगे यांनी केले तर सूत्रसंचालन परमपूज्य हरिराज विध्वंस यांनी केले.
पहिले पुष्प गुंफताना महानुभाव पंथातील कुमारी जामोदकर, कुमारी स्वरा विध्वंस कुमार, प्रतीक विध्वंस यांनी आपल्या विचाराने सभेला मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महंत श्री. परस राज बाबा महंत, श्री. गौरवराज महंत, श्री. हरिराज भरत बाबा विध्वंस, महेंद्र मुनी बिडकर, केशवराज लांडगे, अक्षय विध्वंस, दत्तराज लांडगे, अक्षय लांडगे परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने महानुभाव पंथातील साधूसंत उपस्थित होते.