दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाला त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याबद्दल हुतात्मा अपंग बहुद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, राठीवडे यांच्या वतीने देण्यात येणारा पहिला राष्ट्रीय ‘युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२४’ स्वामी विवेकानंदच्या तपभूमी कन्याकुमारी येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री. सुनिल कुमार (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी), श्री. अंगिरसाजी, सुनिल फडतरे, गुरुदास मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, सदस्य, सेवा मंडळातील सर्व स्वामीभक्त, सभासद या सर्वांचे फलटणमधील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.