दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२४ | फलटण |
सगुणामाता नगर, मलठण (तालुका फलटण, जिल्हा सातारा) येथे चोरट्याने दि. २२ मे २०२४ ते दि. २६ मे २०२४ रोजीच्या सकाळीपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी प्रमोद लालासो मदने (रा. सगुणामाता नगर, मलठण) यांच्या घरात घुसून एक डेल १४ कंपनीचा लॅपटॉप अंदाजे किंमत २५ हजार रुपये व रोख १० हजार रुपयांची रक्कम, असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीची फिर्याद मदने यांनी फलटण शहर पोलिसात दिली आहे.
या चोरीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.