सोमंथळी (फलटण): ध्येय करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे आर्मी भरतीत घवघवीत यश


सोमंथळीतील ध्येय करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आर्मी भरतीत यश मिळवले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकांना कमी खर्चात मार्गदर्शन केल्याबद्दल शिक्षकांचा सन्मान झाला.

स्थैर्य, सोमंथळी (फलटण), दि. 20 जानेवारी : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी देशसेवेत भरती व्हावे, या ध्येयाने कार्यरत असलेल्या ध्येय करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आर्मी भरतीत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटना, फलटण तालुक्याच्या वतीने अकॅडमीचे मार्गदर्शक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

नुकत्याच जाहीर झालेल्या आर्मी भरतीच्या निकालात सोमंथळी, ता. फलटण येथील ध्येय करिअर अकॅडमीचे १४ विद्यार्थी यशस्वी झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प खर्चात भरतीपूर्व प्रशिक्षण देत देशसेवेसाठी घडवण्याचे कार्य अकॅडमी करत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या भरतीत धीरज बोडरे, मयूर पवार, आर्यन कदम, आयुष देवर्षी, सायरस पाटील, वैष्णव राजगे, तेजस चव्हाण, वैभव सपकाळ, साहिल खोत, संकेत जेडगे, अभय निकम, शिवराज माने, ऋषिकेश नाळे आणि महेश बाड या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

या यशाबद्दल ध्येय करिअर अकॅडमीचे संस्थापक रोहित यादव तसेच तज्ञ शिक्षक अजित तरटे, संकेत भंडलकर, समाधान तांबे आणि सचिन डांगे यांचा अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.

“शेतकऱ्यांच्या घरातील मुलांना देशसेवेत भरती करण्याचे महत्त्वपूर्ण काम ध्येय करिअर अकॅडमी करत आहे,” असे मत वस्ताद संदीप शेंडगे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना ॲड. किशोर शिंदे म्हणाले की, “स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. रोहित यादव यांनी सोमंथळी सारख्या ग्रामीण भागात पोलीस, आर्मी व स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत मार्गदर्शक टीम उभी केली असून विद्यार्थ्यांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.”

या कार्यक्रमास अखिल भारतीय बैलगाडी संघटना, फलटण तालुक्याचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, बैलगाडी मालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!