सोलापूर: जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी; ऑनलाईन नोंदणी सुरु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सोलापूर, दि.१ : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात  नऊ तूर खरेदी केंद्रांना  मंजुरी दिली असून 28 डिसेंबर 2020 पासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी  भास्कर वाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतिच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे. तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाईन नोंदणीसाठी  7/12 उतारा,  (त्यावर तूर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे), आधारकार्ड, बँक पासबुकची  झेरॉक्स (बॅक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड असावा) कागदपत्राची आवश्यकता आहे.

खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करुन वाळवून उच्च प्रतिच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी. जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.भास्कर वाडीकर यांनी केले आहे.

तूर खरेदी केंद्राचे ठिकाण व नावे

अक्रतूर खरेदी संस्थेचे नांव केंद्राचे ठिकाण केंद्रास जोडलेले तालुके
1संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढासोलापूरद.सोलापूर व उ.सोलापूर
2संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढाअक्कलकोटअक्कलकोट
3विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. दुधनीदुधनीअक्कलकोट
4तुळजाभवानी कृषी व  साधन पुरवठा सह. संस्था मर्या, उंबरगे, बार्शीबार्शीबार्शी
5कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडीकुर्डूवाडीमाढा
6तालुका खरेदी विक्री संघ, मंगळवेढामंगळवेढामंगळवेढा व पंढरपूर
7विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगीकरमाळाकरमाळा व माळशिरस
8विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.अनगरअनगरमोहोळ
9भाळवणी कृषी फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी लि, भाळवणीमरवडेमंगळवेढा व सांगोला

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!