बारामती पुलावर सहाचाकी हायवाची दुचाकीला धडक; एक ठार


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटणमधील बारामती पूल येथे शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास टाटा हायवा (क्र. एमएच-४६-एएच-६६७७) सहाचाकी गाडीने दुचाकीला (क्र. एमएच-११-क्यू-२६९५) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचालक दीपक कृष्णा कदम (वय ६५, रा. संजय गांधी नगर, सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हे १० ते १५ फरफटत नेले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून टाटा हायवाचा चालक हणमंत बाबुराव धुमाळ (वय ५९, रा. मठाचीवाडी, पो. निंबळक, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सपोनि नितीन शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!