कोळकी व साखरवाडीसह फलटण तालुक्यातील सहा गावे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप


स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटण तालुक्यामध्ये गेले काही दिवसांत कोरोनाची रुग्ण संख्या चांगलीच वाढू लागली आहे. फलटण तालुक्यामधील कोळकी, साखरवाडी, झिरपवाडी, जोरगाव, वाठार निं. व जाधववाडी ही गावे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत, असे आदेश फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी पारित केलेले आहेत.

कंटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावामध्ये हॉस्पिटल व मेडिकल वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहतील तर सकाळी ६ ते ९ मध्ये फक्त दूध व भाजीपाला अशा सेवा सुरू राहतील. कंटेंटमेंट झोन व बफर झोन करिता असलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहील, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!