फलटणच्या चावडी चौक व कापसे गिरण परिसरात चोरीचा प्रयत्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहरातील चावडी चौक व कापसे गिरण बोळात पहाटे दोननंतर चोरीचा प्रयत्न झाला असून, नागरिक सतर्क झाल्याने पलायन केल्याने घबराट पसरली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : फलटण शहरातील चावडी चौक परिसरात पहाटे दोन वाजल्यानंतर तीन बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रहिवासी जागे झाल्याचा अंदाज आल्यानंतर चोरटे पळून गेले.

कापसे गिरण बोळातही हालचाल

कापसे गिरण परिसरातील बोळातही दोघेजण संशयास्पदरीत्या दिसून आले. तेथेही नागरिक जागे झाल्यानंतर ते पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. रिंगटोनचा आवाज आल्याने व नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने चोरीचा प्रयत्न टळल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

शहरात चोरीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागात काही हालचाल किंवा अडचण जाणवल्यास नागरिकांनी तातडीने एकमेकांना फोन करून संपर्क साधावा, एकत्र यावे व जिथे अडचण येईल तिथे सर्वांनी मदतीसाठी उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांची माहिती प्रलंबित

या प्रकाराबाबत अद्याप फलटण शहर पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!