दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । पुणे । सिध्दार्थ कुलकर्णी यांची अ.भा.मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राहुल खरात (अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.
सिध्दार्थ कुलकर्णी यांनी ९० च्या दशकात चित्रपट सृष्टीतील चित्रपट प्रमोशनसाठी वृत्तपत्रीय लेखन केले असून त्यांना १८ विविध पुरस्कार मिळाले आहेत.
नाटक असो की सिनेमा, सिरीयल असो की डान्स शो, रिॲलिटी शो.. रेडिओ असो की भाषा कुठलीही असो जवळपास सर्वच भाषांत प्रसिध्दी करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ती अविरतपणे त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली. नुकत्याच उदगीर येथील साहित्य संमेलनात , तसेच ठाणे , पुणे येथील संमेलनात सक्रिय सहभागी होवून साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याचा आणि मराठी साहित्य संपुर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम हाती घेतलं आहे.