राज्यात ‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विविध दाखले व सेवांचे कामकाज विस्कळीत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य शासनाचे महत्त्वाचे मानले जाणारे ‘आपले सरकार’ पोर्टल तांत्रिक दुरुस्ती आणि डेटा सेंटरच्या स्थलांतरामुळे आगामी बुधवारपर्यंत बंद राहणार असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ ऑक्टोबर : नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देणारे राज्य शासनाचे ‘आपले सरकार’ पोर्टल तांत्रिक कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे. महाआयटीतर्फे राज्यभरातील डिजिटल सेवांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधा अधिक स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू

राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांची संकेतस्थळे, पोर्टल्स आणि डीबीटी सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी डेटा सेंटरचे स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान संबंधित ऑनलाइन सेवा काही दिवस बंद राहणार असल्याने दाखले मिळवण्याची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत.

विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय

शैक्षणिक दाखले, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना या कालावधीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!