जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांचा भाजपा कोळकीच्या वतीने विशेष सत्कार!

‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून जागतिक विक्रमाची नोंद झालेल्या सिद्धाली शहा यांचा कोळकी येथे भाजपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून ‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून नामांकन मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेल्या फलटणच्या लेकीचा, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा भारतीय जनता पार्टी कोळकीच्या वतीने नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. हा छोटेखानी सत्कार समारंभ कोळकी येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.

नेत्यांच्या विश्वासामुळेच जागतिक सन्मान

सत्काराला उत्तर देताना कु. सिद्धाली शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला नगरपरिषदेत काम करण्याची संधी दिली, त्यामुळेच आज ‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून मला हे मानांकन मिळाले आहे. भाजपा कोळकीने आज माझा जो सन्मान केला आहे, तो मी कधीही विसरू शकणार नाही.”

मान्यवरांची उपस्थिती आणि मनोगत

या सत्कार प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य विकास नाळे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, युवा नेते संजय देशमुख आणि माजी सरपंच सौ. रेश्मा संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या कार्याची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!