शुभम नलवडे यांची सरपंच परिषद संघटनेच्या फलटण तालुकाध्यक्षपदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२४ | फलटण |
अखिल भारतीय सरपंच परिषद पुणे संघटनेच्या फलटण तालुकाध्यक्षपदी आळजापूर, ता. फलटण येथील कार्यक्षम सरपंच शुभम बाळासाहेब नलवडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

शुभम नलवडे यांनी सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर आळजापूर येथे विविध विकासकामे केली आहेत. नलवडे यांची फलटण तालुक्यात केलेल्या विविध समाजोपयोगी कामांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नियुक्तीपत्र प्रदान करताना सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार श्री. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संतकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!