एसटी कामगार सोसायटी निवडणुकीत श्रीराम पॅनलचा दणदणीत विजय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 17 मार्च 2025। फलटण । एस टी को ऑपरेटिव्ह सोसायटीत कामगार संघटना पुरस्कृत श्रीराम पॅनलचे सर्व 15 उमेदवार निवडून दणदणीत विजय मिळविला.
कामगार संघटनेच्या पॅनल विरोधात अनेक संघटना एकत्र येऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कामगार संघटनेचे नेतृत्व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या कार्यशैलीवर कामगारांनी असा विश्वास दाखवून पूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले..
या विजयासाठी सातारा विभागीय अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, सातारा विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, विभागीय संघटक सचिव सुशांत मोहिते, विभागीय खजिनदार प्रकाशराव पाटील, माजी बँक संचालिका सौ. लाडूताई मडके यांनी मोलाचे प्रयत्न केले.
फलटण आगार सचिव योगेश भागवत, अध्यक्ष बाळासाहेब सोनावले, कैलास काटे, बापूराव कोलवडकर, निराप्पा वाघमोडे, निलेश बोधे, सुरेश अडागळे, देविदास निंबाळकर,गणेश सावंत यांनी निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!