श्रीराम जवाहरचे गाळप 1 लाख 81 हजार तर 2 लाख क्विंटल साखर तयार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा
स्थैर्य, फलटण दि. २९: श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने (श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण) दि. 27 डिसेंबर अखेर 1 लाख 81 हजार 203 मे. टन ऊसाचे गाळप करुन 2 लाख 800 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 11.21 % पडला असल्याचे श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.
काल (दि.28) दि. 1 ते दि. 15 डिसेंबर अखेर गाळपास आलेल्या 47 हजार 686 मे. टन ऊसाचे प्रति टन 2592.10 रुपये प्रमाणे 12 कोटी 36 लाख 8 हजार 170 रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले, यावेळी श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील, श्रीराम कारखान्याचे कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर उपस्थित होते.
दि. 15 डिसेंबर अखेर गाळप झालेल्या 1 लाख 41 हजार 407 मे. टन ऊसाचे प्रति टन 2592.10 रुपये प्रमाणे आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 36 कोटी 65 लाख 41 हजार 85 रुपये अदा केले असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दि. 16 ते 30 नोव्हेंबर या काळावधीतील तोडणी वाहतुकीचे पेमेंट 2 कोटी 45 लाख, 96 हजार 167 रुपये संबंधीतांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!