फलटण: श्रीराम सोसायटीत कर्मवीरांना अभिवादन – आठवणींना उजाळा


श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या चार शाखांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन पार पडला. यावेळी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 10 मे : श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय आणि वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतिदिन नुकताच पार पडला.

संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके) आणि महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार मुगुटराव कदम उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. एस. डी. यादव यांनी कर्मवीरांच्या जीवनातील अनेक शैक्षणिक व सामाजिक प्रसंग उलगडले.

डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यातील ऋणानुबंध व्यक्त केले. तसेच, गतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. आजच्या पिढीने कर्मवीरांचे विचार आचरणात आणून ते पुढे घेऊन जावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सी. आर. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. डी. यादव यांनी केले, तर आभार प्रा. एस. एन. राऊत यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!