श्रीराम बझारतर्फे १० जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान ‘भव्य तांदूळ महोत्सव’; आकर्षक बक्षिसे…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील प्रसिध्द श्रीराम बझारतर्फे नूतन वर्ष व मकर संक्रांतीनिमित्त भव्य तांदूळ महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात ग्राहकांना फलटण तसेच जिल्ह्यातील श्रीराम बझारच्या सर्व शाखांमध्ये विविध प्रकारचे सुगंधी व देशी तांदूळ स्वस्त व रास्त दरात खरेदी करता येणार आहेत. त्यासोबत १० किलो व त्यापटीत तांदूळ खरेदी केल्यास ग्राहकाला त्यावर कूपन भेटणार असून या कूपनवर अनेक प्रकारची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

सर्वांना आवडणारा, सर्वांना परवडणारा, ग्राहकांचा आपला ‘श्रीराम बझार’ यांनी भरपूर बचत करणारा हा महोत्सव ग्राहकांसाठी आणला आहे.

या महोत्सवामध्ये अनेक प्रकारच्या उच्च दर्जाच्या तांदळाच्या भरपूर व्हरायटीज् ग्राहकांना मिळणार आहेत. या महोत्सवात :
‘नाशिक घोटी’ येथील सुप्रसिद्ध इंद्रायणी गावकरी, शेतकरी, सोनपरी, इंद्रायणी कणी,
‘मध्य प्रदेश वारासिवनी’ येथील सुप्रसिद्ध आंबेमोहर, उडनपरी, नड कोलम, स्वस्तीक वाडा कोलम,
स्वस्तीक वाडा कोलम, चाँदतारा कोलम, शारदातारा कोलम,
कोहिनूर बासमती- ट्रेडीशनल, दुबार, तिबार ट्रॉफी,
‘दावत बासमती’- रोझाना, गिनी, मिनी, टिनी, निकी, सुपर- ९०, बिर्याणी तांदूळ,
‘इंडिया गेट बासमती’ -इंडिया गेट मोगरा, इंडिया गेट मिनी मोगरा, इंडिया गेट मिनी मोगरा,
‘कणी व तुकडा तांदूळ’ भरपूर व्हरायटी व इतर नामांकित कंपनीचे तांदूळ वाजवी दरामध्ये विक्रीस उपलब्ध असणार आहेत.

तांदूळ खरेदी कूपनवर ग्राहकांना –

  • इलेक्ट्रिक तंदूर मशीन ३ नग (विभागून),
  • इलेक्ट्रिक ब्लेण्डर ३ नग (विभागून),
  • इलेक्ट्रिक टिफीन सेट ५ नग (विभागून)
    अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ही योजना श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालय फलटण, तरडगाव, लोणंद, दहिवडी, पवारवाडी, गोंदवले बु॥, महात्मा फुले शॉपिंग सेंटर फलटण, मलठण, कोरेगाव, म्हसवड, शिरवळ, कोळकी, साखरवाडी या शाखांवरती लागू राहणार आहे.

वरील बक्षीस योजना दि. १० जानेवारी २०२५ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ या मुदतीत तांदूळ खरेदीवर असणार आहे.

योजना सोडत दि. रविवार १६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता निघणार आहे.

तसेच दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी खास मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला आहे.

हा समारंभ रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी स. ११.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत होणार आहे. यावेळी सर्व महिला भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम बझार, मुख्य कार्यालय, फलटण यांनी केले आहे.

श्रीराम बझारच्या भव्य तांदूळ महोत्सव, हळदी-कुंकू समारंभ व बक्षीस योजनेचा लाभ फलटण व श्रीराम बझारच्या सर्व शाखांवर जास्तीत ग्राहक व महिलांनी घ्यावा, असे आवाहन संचालक, श्रीराम बझार, फलटण यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीराम बझारच्या – (०२१६६) २२०७०२/२२०८५८ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीराम बझारने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!