नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात पंचकल्याणक महोत्सव सोहळा संपन्न!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १२ जानेवारी २०२५ | फलटण |
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरनजीक नांदणी येथे जैन समाजाचा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे. येथे पंचकल्याणक महोत्सव उत्साहात व आनंदात संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंचकल्याणक सोहळ्यास भेट देऊन या क्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याचे जाहीर केले. पंचकल्याणक कार्यक्रमात कर्नाटक व महाराष्ट्रामधील बहुसंख्य श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घेतला.

फलटणमधील प्रसिद्ध १००८ श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त पदाधिकारी यांनी श्री क्षेत्र नांदणी येथील पंचकल्याणक महोत्सवास भेट दिली. मंदिर समितीचे सचिव श्री. मंगेश शेठ दोशी (गुणवरेकर), खजिनदार श्री. अरिंजय काका शहा, ज्येष्ठ विश्वस्त श्री. उदयकाका शहा, विश्वस्त श्री. राजेंद्र कोठारी (बुधकर) तसेच श्री. नंदिश्वर दोशी (गुणवरेकर) यांनी भेट दिली.

श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाच्या वतीने श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विश्वस्तांचा कार्यक्रमस्थळी सत्कार करण्यात आला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!