
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । फलटण । सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी साताराचे नुतन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांचे यथोचित सत्कार करून स्वागत केले व यावेळी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा जिल्ह्यासाठी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा सुध्दा यथोचित सत्कार केला.

यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उपविभागीय अधिकारी विवेक जाधव, फलटण पंचायच समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, प्रगतशील शेतकरी रामदास कदम, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.



