दैनिक स्थैर्य | दि. 26 सप्टेंबर 2023 | मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीमंत संजीवराजे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.