यशवंत को-ऑपरेटीव्ह बँक अपहार प्रकरणातील व्यवस्थापकासह आठजणांची निर्दोष मुक्तता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण, जि. सातारा येथील तत्कालीन व्यवस्थापक उदय शिवराम पाटणे यांच्यासह उपव्यवस्थापक सुभाष दत्तात्रय हेन्द्रे, कॅशिअर विलास कृष्णाजी भोईटे व क्लार्क जगदीश बाळकृष्ण दिक्षित, राजकुमार दिलीप दिक्षित, सुनिल बाळकृष्ण दिक्षित, महादेव नाना देवकाते तसेच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण, ग्राहक संस्था, औद्योगिक संस्था, या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. जयश्री उदय पाटणे यांचे विरूध्द तथाकथित २०,६६, ४३१/- रूपयांच्या अपहार प्रकरणी फौजदारी खटला दि. २० सप्टेंबर १९९७ चा दाखल केला होता.

हा फौजदारी खटला क्र. ९४/९८ दिनांक १८/५/१९९८ चा फलटण येथील मे. २ रे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फलटण यांचे न्यायालयात गेली २५ वर्षे चालू होता. या खटल्याचा निकाल पिठासीन अधिकारी श्रीमती एस. डी. साबळे साहेब यांनी दि. ०२/०९/२०२३ रोजी देवून वरील १ ते ८ (तथाकथीत संशयित आरोप असलेल्यांची) यांची फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

सदर फौजदारी खटल्यामध्ये आरोपीतर्फे अ‍ॅडव्होकेट रामकृष्ण बाबुराव धुमाळ यांनी कामकाज पाहिले.


Back to top button
Don`t copy text!