राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 26 सप्टेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (ना. अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे.

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी आगामी काळात सक्षमपणे कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच पुढील निवडी जाहीर करण्यात येणार आहेत.

गत तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी केल्याने फलटण शहरात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येत आहे.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!