महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे यांची बिनविरोध निवड


दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | पुणे |
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा (चौवार्षिक निवडणूक कार्यक्रम-२०२४-२०२८) रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचे राजे ग्रुप, फलटण यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!