श्रीकृष्ण जन्माष्टमी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूल सातारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. सर्व विद्यार्थी हे पारंपरिक वेशभूषेत शाळेत आले होते. या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून, हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान कृष्ण आणि दही हंडी यांच्या प्रतिमांसह या कार्यक्रमासाठी शाळेचे सभागृह सुशोभित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राधा आणि श्रीकृष्णाची वस्त्रे परिधान केली होती. शाळेच्या सभागृहात दही-हंडी बांधण्यात आली. जन्माष्टमी गाण्यांच्या तालावर विद्यार्थी आणि नृत्य केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी वर्षा बागल उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पवार यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची संदर्भात माहिती सांगितली. सर्व विद्यार्थी श्रीकृष्ण व गोपीच्या वेषात आले होते. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रोहित कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला.


Back to top button
Don`t copy text!