श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी पादुका परिक्रमा २७ फेब्रुवारीला फलटणमध्ये मुक्कामी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२५ | फलटण |
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट या धर्मादाय संस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी पादुका परिक्रमा प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केली असून ही पालखी पादुका परिक्रमा दि. २१ नोव्हेंबर २०२४ ते २६ जून २०२५ अखेर संपन्न होत आहे. श्री स्वामींच्या प्रासादिक पादुका फलटण शहरामध्ये गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुक्कामी येत असून या पालखी पादुकांसोबत २५ ते ३० सेवेकरी आहेत, अशी माहिती फलटण येथील स्वामीभक्त संजय चोरमले यांनी दिली आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट ह्या धर्मादाय संस्थानाच्या नियोजित महाप्रसादगृहाच्या पाच मजली भव्य व सुसज्ज इमारत बांधकाम प्रकल्पासाठी तसेच येथे दररोज हजारो स्वामी भक्तांसाठी अविरत चाललेल्या अन्नदानाच्या स्वामी कार्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, या हेतूपोटी सदरच्या श्रींच्या पालखी पादुका परिक्रमेचे आयोजन केले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकाची व्यवस्था करून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत धन्य व्हावे, असे आवाहन स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे.

पालखी पादुकांसोबतचा संपर्क क्रमांक :
मो. ९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!